Latest Marathi News

BREAKING NEWS

१५० व्या वसंत व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन “भारतीय ज्ञानसंपदा, विश्व कल्याणाची गंगोत्री” या विषयावर मांडले विचार

0

पुणे : देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना बलशाली आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध पिढी घडविण्याच्या उद्देशातून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी वसंत व्याख्यानमाला सुरु केली. १५० व्या व्याख्यानमालेच्या समारोप सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी पाटील यांनी “भारतीय ज्ञानसंपदा, विश्व कल्याणाची गंगोत्री” या विषयावर आपले विचार मांडले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी “भारतीय ज्ञानसंपदा, विश्व कल्याणाची गंगोत्री” या विषयावर विचार मांडताना आपल्या देशाच्या वैभवशाली ज्ञान परंपरेतील अनेक दाखले दिले. चंद्रकांत पाटील यांनी व्याख्यानाला सुरुवात करण्यापूवी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धाजंली अर्पण केली. वसंत व्यख्यानमालेमध्ये व्यख्यान करायला मिळणं हा मोठा सन्मान समजला जातो, असे पाटील यावेळी म्हणाले.

१५ ऑगस्ट २०२२ ज्यावेळी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी पंतपधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जे संबोधित करायचं असतं. यावेळी त्यांनी जे भाषण केलं. २०४७ साली शंभर वर्ष पूर्ण होतील. या २५ वर्षात आपण असं काम करायचं कि जगात भारतच जे पूर्वीसारखं स्थान होतं, ती स्थिती आपण पुन्हा आणू शकतो. यावेळी त्यांनी पाच संकल्पना मांडल्या. त्यातील दोन संकल्पना महत्वाच्या आहेत. त्यातील एक म्हणजे लोकांना गुलामगिरीच्या मानसिकतेततून बाहेर काढलं पाहिजे. यासाठी भारतीय ज्ञान परंपरा नीट मांडली पाहिजे असे त्यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख याबाबत माहिती दिली. त्यासोबतच २०४७ मध्ये स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत असताना आपल्या देशाच्या ज्ञान परंपरातून संज्ञापित होऊन एक पाऊल पुढे टाकण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

वसंत व्याख्यानमालेच्या वैभवशाली परंपरेचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.