Latest Marathi News

BREAKING NEWS

‘मी निर्दोष आहे…….’; तुनिषा शर्मा प्रकरणावर शीझान खानचं वक्तव्य

0

मुंबई | अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर कलाविश्वात एकाच खळबळ उडाली होती. तुनिषाच्या आत्महत्या प्रकरणात तिचा प्रेयसी अभिनेता शीझान खानला ताब्यात घेण्यात आलं असून रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तुनिषा प्रकरणी रोज नवी माहिती समोर येत असून प्रकरणाला नवं वळण मिळत आहे.

अशातच शीझान खानने याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. शीझान खानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी त्याच्या वतीने एक निवेदन जारी केले आहे. वकीलांनी शीझानच्या वतीने सांगितलं, “वसई, कोर्टात हजर करण्यापूर्वी शीझान खानने त्याच्या संपूर्ण कुटुंबाची भेट घेतली होती. त्यादरम्यान, माध्यमांसमोर बोलताना अभिनेता म्हणाला होता की, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तो निर्दोष आहे, ‘सत्यमेव जयते…’ असे उदगार त्याने काढले होते.

आज सोमवारी शीझानचे वकील मिश्रा न्यायालयात खटल्याच्या संदर्भात पहिला जामीन अर्ज दाखल करणार आहेत. 28 वर्षीय अभिनेता शीझान खानला कोर्टात हजर करण्यात आले. त्याचवेळी शीझानच्या वतीने वकिलाने तुरुंगात त्याचे इनहेलर आणण्याची मागणी केली होती, त्याशिवाय त्याने घरचे जेवण मागवण्याची परवानगीही दिली होती.आज सोमवारी शीझानचे वकील मिश्रा न्यायालयात खटल्याच्या संदर्भात पहिला जामीन अर्ज दाखल करणार आहेत.

28 वर्षीय अभिनेता शीझान खानला कोर्टात हजर करण्यात आले. त्याचवेळी शीझानच्या वतीने वकिलाने तुरुंगात त्याचे इनहेलर आणण्याची मागणी केली होती, त्याशिवाय त्याने घरचे जेवण मागवण्याची परवानगीही दिली होती.शिझानने तिला लग्नाचं वचन दिलं होतं . पण त्यासाठी तो तिच्यावर धर्म बदलण्याची जबरदस्ती करत होता. तसेच त्याच्या बहिणीने तुनिषाला दर्ग्यातही नेले होते.’ तुनिषाच्या आईने केलेल्या या दाव्यामुळे सगळीकडे खळबळ माजली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.