Latest Marathi News

BREAKING NEWS

बार्शी मध्ये पुन्हा तिसरी घंटा वाजणार आणि नाट्यगृहाचा पडदा उघडणार …

0

बार्शी |

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने कलायात्री प्रतिष्ठान बार्शी आयोजित 17 वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा, बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन या ठिकाणी 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये संपन्न होणार आहेत. दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते नटराज मूर्तिपूजन व रंगभूमी पूजन करून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. उस्मानाबाद केंद्राच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये दुष्काळ, आमचे काय चुकले, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, लॉकडाऊन नंतरचा गणेश उत्सव, पट्टेरी, बळीराजा, गळफासातून सुटका, स्वच्छता अभियान, लसीकरणाची कथा, हरवल्या संवेदना हरवला संवाद, शेतकरी आत्महत्या, चुलीत गेली तुझी नोकरी, शेतकरी कष्टकरी, मुलींना शिकवा स्वावलंबी बनवा, प्रतिबंध बाल विवाह, शेतकऱ्याची एक आत्महत्या, नाही चावता मला, संवाद, हुंडाबंदी झाली पाहिजे, भोंदूगिरी, करामत, गोष्टींची स्टोरी, शेतकरी राजा, स्वच्छता गाव आणि स्वामिनीनिष्ठा या 27 बालनाट्यांचे सादरीकरण होणार आहे.

सदरील बालनाट्य स्पर्धा सर्व नाट्य रसिकांसाठी खुल्या असून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नसून, बार्शी शहर आणि तालुक्यातील नाट्यप्रेमींनी या बालनाट्य स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन कलायात्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.