बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले हे नाव महाराष्ट्रासाठी नवीन नाहीये आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत राहणारे अभिजीत बिचुकले आमदार. खासदार आणि राष्ट्र्रपतीची निवडणूक लढले आहे.अशातच आता पुन्हा एकदा अभिजीत बिचुकले चर्चेत आले आहे. महिलांना ५० टक्के ST प्रवासात देण्यात आलेल्या सुटवर त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
महिला वर्गाला एसटी बसच्या प्रवासासाठी 50 टक्के सवलत दिली, त्याबाबत सरकारचे अभिनंदन करतो, मात्र महिला वर्गाची खरी गरज असणाऱ्या सिलेंडरला 1200 रुपये द्यावे लागतात, ताबडतोब सिलेंडरवर 50 टक्के सबसिडी द्यावी’, असे बिचुकले यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच ‘महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महिला असेल, ही भूमिका मी मांडली होती, मात्र आता माझी कॉपी इतर लोक करायला लागले आहेत. मी बैल आहे, माझी कॉपी कुणी करू नये. बेडकाने बैल व्हायचं पाहू नये,’ असा टोला अभिजीत बिचुकले यांनी लगावला आहे.
काहीच दिवसांपूर्वी कसबा पेठ पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकले अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले होते. या निवडणुकीत अभिजीत बिचुकले यांना ४७ मते मिळाली होती यापूर्वी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आदित्य ठाकरे विरोधात वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. नगरसेवक ते खासदार निवडणूक लढवणारे अभिजित बिचुकले यांनी नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राची अजूनही चर्चा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती पदासाठी पत्र लिहून ‘भारताचे राष्ट्रपती म्हणून तुम्ही माझेच नाव घोषित करावे,’ अशी विनंती केली होती