सोलापूर |
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील व त्यांच्या पत्नी यांनी पंढरपूर मध्ये रुक्मिणी-पांडुरंगाचे दर्शन घेतले याप्रसंगी त्यांचे सोबत उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत दादांनी पंढरीच्या पांडुरंगा चरणी लीन होऊन, बा विठ्ठला! माझ्या सर्व महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी व आरोग्यदायी जीवन मिळू दे, असे साकडं चंद्रकांत दादांनी विठ्ठलाकडे घातले आहे.
मंदिर समिती सहअध्यक्ष श्री औसेकर महाराज यांनी समितीच्या वतीने मंत्री महोदयांचा स्वागतपर सत्कार केला …!