Latest Marathi News

BREAKING NEWS

सागरी विद्यापीठ कायदा हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात आणला जाईल – चंद्रकांत पाटील

0

मुंबई |

रत्नागिरी जिल्ह्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांबाबत आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मुंबईतील सिंहगड येथील शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. तसेच यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात सागरी विद्यापीठ कायदा विधिमंडळात आणला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी आश्वस्त केले.

यावेळी सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करण्याचे आदेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यासोबतच रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय विधी महाविद्यालय स्थापन करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देखील पाटील यांनी बैठकीत दिल्या.

या बैठकीला रत्नागिरीचे उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग, तंत्रशिक्षण संचालक डॉ विनोद मोहितकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.