मुंबई प्रतिनिधी | १६ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या टी २० विश्वचषकचे प्रक्षेपण सर्व भाषांमध्ये दाखवले जाणार असून फक्त मराठीला डावलण्यात आल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेनं याविरोधात आंदोलन पुकारले होते या आंदोलनाची धास्ती घेत स्टार-स्पोर्ट्स वाहिनीचे प्रसाशकीय अधिकारी आज दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहचले होते. या भेटीला ज्यांनी हा मुद्धा उचलून वाहिनीविरोधात आंदोलन पुकारले होते ते नवनिर्मान टेलिकॉम सेनेचे अध्यक्ष सतीश नारकर तसेच सरचिटणीस निर्मल सुदाम निगडे, प्रमोद मांढरे, उपाध्यक्ष दिनेश वाटवे, संतोष पगारे, चिटणीस आशिष गावडे, विशाल सहानी, सलीम पागरकर, अभय पारकर उपस्थित होते.
या भेटीदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तसेच पुन्हा अशी चूक होणार नाही याविषयी खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करत झालेली चूक सुधरण्यासाठी काही वेळेचा अवधी दिला आहे तसेच दिलेल्या कालावधीमध्ये चूक सुधारली नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा सज्जन दमच दिला होता.
या संदर्भात माध्यमांनी आंदोलनाविषयी एमएनटीएस अध्यक्ष सतीश नारकर यांना विचारले असता ते म्हणाले की, राज साहेबांनी या वाहिनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही वेळेचा अवधी स्टार स्पोर्ट्स वहिनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे तसेच दिलेल्या अवधीमध्ये त्यांनी आपली चूक सुधारली नाही व मराठी भाषेचा योग्य तो सन्मान त्यांच्याकडून केला गेला नाही तर ठरल्याप्रमाणे वाहिनीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेना उग्र आंदोलन पुकारेल असा इशारा वजा समज प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सतीश नारकर यांनी स्टार स्पोर्ट्स वहिनीला दिला आहे.