मराठा आरक्षण| सर्वात मोठी बातमी: मागासवर्गीय अहवाल मिळाल्यावर मुख्यमंत्र्यांचे पहिले महत्वाचे वक्तव्य… काय म्हणाले वाचा..
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात महत्वाची बातमी आली आहे. मराठ्यांना महाराष्ट्रात स्वतंत्र आरक्षण लागू करण्यासाठी नेमलेल्या मागासर्वगीय आयोगाचा अहवाल आला आहे. आज हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला. या अहवालातून मराठा समाज हा मागास आहे, हा निष्कर्ष असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. राज्य मागासवर्गीय आयोगाने रात्रंदिवस काम केले. सुमारे चार लाख लोकांनी ही जबाबदारी पार पडली. यामध्ये अनेक लोकांनी मदत केली. यामुळे हा अहवाल जलदगतीने तयार झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल
मराठ्यांना महाराष्ट्रात स्वतंत्र आरक्षण लागू करण्यासाठी नेमलेल्या मागासर्वगीय आयोगाचा अहवाल आला आहे. आज हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल. त्यानंतर शासन निर्णय घेईल. त्यासाठी विशेष अधिवेशन २० फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. या अधिवेशनात त्या अहवालावर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आता कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजास मिळणार आहे. यामुळे दुसऱ्या कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही. यामुळे मागावर्गीय आयोगाचा अहवाल मराठा समाजाच्या बाजूने असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे म्हटले जात आहे.
कायद्याच्या चौकटीतील आरक्षण
मागासवर्गीय आयोगाचा हा अहवाल आता मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाईल. त्यामध्ये चर्चा करुन शासन पुढील निर्णय घेईल. त्यासाठी विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला होणार आहे. त्यात अहवालावर चर्चा होणार आहे. अहवाल तयार करण्याच्या या कामात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त या सगळ्यांची टीम काम करत होती. जवळपास 2.25 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांच सर्वेक्षण यात करण्यात आले.
ज्या पद्धतीने काम झाले आहे, त्यामुळे शासनाला विश्वास आहे की, मराठा समाजाला शैक्षणिक, सामाजिक मागसलेपणावर टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण मिळेल. ओबीसी आरक्षणाला कोणतही धक्का न लावता तसेच इतर समाजावर अन्याय न करता हे आरक्षण असणार आहे असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले आहे.