Latest Marathi News

BREAKING NEWS

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला अमित शहा यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात ठरणार?

0

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचाली वेगाने सुरु झाल्याची चर्चा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या (19 फेब्रुवारी) कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कोल्हापुरात असणार आहेत.

शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे. या दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा निर्णय झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सरकारकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विस्तार करण्याकडे शिंदे फडणवीस सरकारचा विचार असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंत्रिमंडळ विस्तार प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधली आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारच होत नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शिंदे गटामध्ये उत्साह संचारला असून त्यामुळे मंत्रिमंडळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.