Latest Marathi News

BREAKING NEWS

मालाडमध्ये शाळेच्या लिफ्टमध्ये अकडून शिक्षिकेचा दुर्देवी मृत्यू

0

 

एका वर्गातील तास संपल्यानंतर दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी निघालेल्या शिक्षिकेचा शाळेतील लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मालाड पश्चिमेत चिंचोली पाठक जवळ असलेला सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जेनेली फर्नांडिस असं मृत शिक्षिकेचं नाव आहे.

फर्नांडिस या जून-२०२२ पासून सेंट मेरी इंग्लिश स्कूलमध्ये सहशिक्षिका या पदावर कार्यरत होत्या. दरम्यान, जेनेली फर्नांडिस या काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास एका वर्गातील तास संपवल्यानंतर दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी निघाल्या. मात्र, तांत्रिक बिघाडामुळं दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट वरच्या दिशेनं जाऊ लागली. लिफ्टमध्यं अडकल्यानं जेनेली या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर फर्नांडिस यांना तात्काळ नजीकच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मालाड पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केलीय.

मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अदाणे म्हणाले की, ” मृत जेनेली फर्नांडिस यांनी लिफ्टमध्ये पाय ठेवला असता लिफ्टनं त्यांना सातव्या मजल्याकडं ओढलं. लिफ्ट आणि भिंतीमध्ये अडकल्यानं जेनेली फर्नांडिस यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान, त्यांनी मदतीसाठी केलेला आरडाओरडा ऐकून शाळेतील कर्मचारी आणि मुलं घटनास्थळी धावून गेले. त्यानंतर जेनेली फर्नांडिस यांना जवळच्या नजीकच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.”

Leave A Reply

Your email address will not be published.