मानखुर्दमध्ये समाजवादी पक्षाच्या नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण, मनसेने केली मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी
मुंबई प्रतिनिधी | दि. २३ जानेवारी मानखुर्द शिवाजीनगर मतदार संघात सध्या गुंडाराज सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार स्थानिक आमदार अबू आझमी यांच्या नगसेवकाकडून आणि कार्यालयातील गुंडांकडून एका महिलेला आणि तिच्या मित्रांना रक्त येऊपर्यंत जबर मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे तसेच त्या महिलेने न्याय मागितला आहे हा व्हिडिओ मनसे उपाध्यक्ष सतीश रत्नाकर नारकर यांनी शेअर करत संताप व्यक्त केला आहे. तसेच ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे.
सतीश नारकर आपल्या ट्विट मध्ये म्हणतायत की, निषेध! निषेध!! निषेध!!! छत्रपती शिवाजी महाराज नगर मानखुर्द विधानसभेत आमदार अबू आझमी यांच्या पक्षाच्या नगरसेवक FAHAD AZMI यांच्याकडून नागरिकांना मारहाण करण्यात आली,आता तरी ह्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्नच सतीश नारकर यांनी ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना विचाराला आहे.
सदर व्हिडिओमध्ये महिला म्हणते आहे की, समाजवादी पक्षाच्या कार्यालयात आम्ही रफिक नगर गल्ली नंबर २ आणि 3 मध्ये जे गटार भरले आहे जो कचरा जमा झाला आहे त्या विषयी आम्ही तक्रार दिली होती. या विषयी नगरसेवकाच्या कार्यलयात समाजवादी पक्षाच्या गुंडांनी आणि स्वतः फवाद आझमी यांच्या जो आपल्या बायकोच्या नावावर बसून पैसे खातो ( कपडे फाडल्याचे ती व्हिडिओमध्ये दाखवत आहे) त्याने माझे कपडे फाडले माझ्या सहकाऱ्यांना मारहाण केली याचा बदला घेतला जाणार असे ती म्हणत आहे तसेच समाजवादी पार्टी मुर्दाबाद !! फवाद आझमी मुर्दाबाद अशा घोषणा तिने व्हिडिओमध्ये दिल्या होत्या.