महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मनसे राज ठाकरे यांची काल गुढीपाडव्यानिमित्त सभा घेतली. यात त्यांनी माहिमच्या दर्गाहचा विषय मांडला. शिंदे-फडणवीस सरकारला इशारा देताच याठिकाणी कारवाई करण्यात आली. तसेच कारवाई न केल्यास त्यांच्या बाजूला गणपती मंदीर उभारण्यात येईल असा इशारा राज ठाकरे यांनी काळाच्या सभेतून दिला होता.
तसेच राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर अनधिकृत मजारवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकर आणि राज ठाकरे यांचं अभिनंदन केले. तर अशा अनेक गोष्टी असतात की सरकारपर्यंत येत नाही. त्यातील काही राज ठाकरे यांनी सांगितल्या. एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने तात्काळ त्या यासंदर्भात कारवाई केली.
सांगलीतही तीन ठिकाणी अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असं आहे. नागपूरातंही एका डीपी रोडवर अतिक्रमण झालंय. ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे तिथे कारवाई व्हावी, ते कुठल्याही धर्माचं असोत. मंदिर असोत की मस्जीद. तर राज ठाकरे यांनी समाजात तेढ निर्माण होईल असं काही म्हटलं नाही. तसेच अतिक्रमण काढणे म्हणजे तेढ निर्माण करणे होत नाही असेही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.