मुंबई । अभिनेत्री केतकी चितळे हे महाराष्ट्रातील वादग्रस्त नाव असून अनेकदा फेसबुक पोस्टमुळे केतकी चितळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे केतकी चितळे जेलची हवा सुद्धा खाऊन आली होती. केतकी जितकी अभिनयामुळे चर्चेत नसते तेवढी ती आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते
केतकीच्या काही अशाही पोस्ट आहेत ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले आहे. आता पुन्हा एकदा तिने आपल्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये केतकीने तिच्या स्टाइलने सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया आकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे.
मात्र, आता केतकीचे ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात देखील केली आहे. यावेळी केतकीने पुण्यात जाऊन थेट पुणेकरांचीच फिरकी घेतली आहे. हिंदू नववर्षाच्या पुणेकरांनी इंग्रजीतून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील लोकांना स्वघोषित मावळे म्हणत अभिनेत्री केतकी चितळेनं त्यांचे कान टोचले आहेत.