Latest Marathi News

BREAKING NEWS

महेश आहेर यांच्या अडचणी वाढणार कार्यभार काढून चौकशी करण्याची उदय सामंत यांचे आदेश

0

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महेश आहेर यांच्यातील वाद फक्त ठाण्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता. हा मुद्धा विधानसभेत सुद्धा चांगलाच चर्चेत राहिला एक सरकारी अधिकारी थेट माजी मंत्र्याला आणि त्यांच्या परिवाराला ठार मारण्याची धमकी वजा सुपारी देत असल्याची ऑडिओ क्लिप प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

यावरून जितेंद्र आव्हाड यांनी खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाब विचारला होता तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांना नशेत फोन करण्याची हिंमत करणाऱ्या या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात यावे, अशी जोरदार मागणी बुधवारी विधान परिषदेत महाविकास आघाडीकरून करण्यात आली. यावर संबंधित अधिकाऱ्याचे अधिकार काढून घेऊन चौकशी केली जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांकडून आणि फेरीवाल्यांकडून दररोज लाखो रुपयांचे वसुली करत असून याबाबतच्या व्हिडिओ व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणातील चित्रफितींची सत्यता तपासून या अधिकाऱ्याला बडतर्फ करणार का, असा सवाल पोतनीस यांनी केला. त्यावर सामंत यांनी एसआयटी चौकशीत असा टीएमसीचा एकही अधिकारी नाही, असा अहवाल आहे, अशी माहिती दिली. तेव्हा अनिल परब यांनी अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन करावे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या प्रकरणी निवेदन द्यावे, अशी मागणी केली. या अधिकाऱ्याची ३० दिवसांच्या आत सविस्तर चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत त्याचा कार्यभार काढून घेतला जाईल, अशी घोषणा सामंत यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.