Latest Marathi News

BREAKING NEWS

महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारचा धिक्कार असो म्हणत, ठाकरे गटाकडून बसेस रोखल्या

0

कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर वक्तव्य केल्याने मागच्या काही दिवसांपासून सीमावादावर जोरदार वादावादी सुरू आहे. जत तालुक्यातील 40 गावे तसेच सोलापूर आणि अक्कलकोट ही शहरही कर्नाटकचा भाग असल्याचे मुक्ताफळे मुख्यमंत्री बोम्मई यांनी उधळली होती. यानंतर त्याचे पडसाद आजही उमटत आहेत.

अशातच काल कर्नाटकमधील हिरेबागेवाडी येथे महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला. यावरून नवा वाद पेटला आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये कर्नाटकच्या बसला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी काळे फासत रोखण्याचा प्रयत्न केला. काल कर्नाटकच्या हिरेबागेवाडी येथे कन्नड वेदिकेच्या लोकांनी महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली. यानंतर काहींना मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी थेट इशारा दिला आहे. यावरून कालपासून जोरदार वादंग सुरू झाला आहे.

दरम्यान औरंगाबादमध्ये कर्नाटकच्या बसला ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी काळे फासत रोखण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (दि. 07) पहाटे 5 च्या सुमारास ही घटना घडली. कर्नाटक सरकारच्या विरोधात औरंगाबादमध्ये ठाकरे गटाची युवासेना जोरदार आक्रमक झाल्याने दिवसभर तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.