पुणे: कोरोनाच्या सावटामुळे लांबणीवर पडलेला महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे.
विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येईल. बोर्डाची अधिकृत वेबसाईट http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात.
विभागनिहाय टक्केवारी
पुणे – 97.34 टक्के
नागपूर – 93.84 टक्के
औरंगाबाद – 92 टक्के
मुंबई – 96.72 टक्के
कोल्हापूर – 97.64 टक्के
अमरावती – 95.14 टक्के
नाशिक – 93.73 टक्के
लातूर – 93.09 टक्के
कोकण – 98.77 टक्के