Latest Marathi News

BREAKING NEWS

लेकीच्या लग्नात दिसला सुनील शेट्टीचा साऊथ इंडियन लुक

0

क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हे काल विवाहबंधनात अडकले आहेत. मागील काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाबाबत जोरदार चर्चा सुरु होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांची लेक अथिया आणि राहुल मागील बऱ्याच काळापासून रिलेशनमध्ये होते. त्यानंतर दोघांनीही आता लग्नगाठ बांधली आहे.

सुनिल शेट्टी यांच्या खंडाळा येथील बंगल्यावर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला क्रीडा आणि चित्रपट जगतातील अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली होती. सुनिल शेट्टीसाठी कालचा दिवस फारच खास होता. कारण त्याच्या लाडक्या लेकीचा लग्न सोहळा काल पार पडला.

दरम्यान, लेकीच्या लग्नासाठी शेट्टी अण्णाचा ओरिजिनल लुक काल सर्वांना पाहायला मिळाला होता. यावेळी अभिनेता सुनील शेट्टीनं प्युअर साऊथ इंडियन लुक कॅरी केला होता. शॉर्ट कुर्ता आणि लुंगी मध्ये अभिनेता खूपच स्मार्ट दिसत होता. राहुल आणि अथिया यांच्या लग्नानंतर अथियाचा भाऊ अहान शेट्टी आणि वडील सुनील शेट्टी यांनी पत्रकारांमध्ये मिठाई वाटली.

Leave A Reply

Your email address will not be published.