Latest Marathi News

BREAKING NEWS

कुंकूलोळ हायस्कूलचा निकाल ९९.२३ टक्के

0

बार्शी : येथील शेठ अगरचंद कुंकूलोळ हायस्कूलचा मार्च २०२०मध्ये झालेल्या शालांत परिक्षेत ९९.२३ टक्के इतका नेत्रदीपक निकाल लागला आहे.
त्याचप्रमाणे डोके ऋषीकेश अनंत या विद्यार्थ्यांने गणित* विषयात १००पैकी १००गुण मिळवून महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकांच्या विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले आहे.
त्याचप्रमाणे संस्कृत व मेकॅनिकल टेक्नाॅलाॉजी विषयात त्याने१००पैकी ९९ गुण मिळवून विशेष प्राविण्य संपादन केले आहे.

डोके ऋषीकेश अनंत (९७.६०,% )

आंधळकर स्नेहल दिपक (९५.४०,% )

मनगिरे राजलक्ष्मी रावसाहेब (९४.४०,% )

हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी ठरले.

एकूण प्रविष्ट – १३१ विद्यार्थ्यांपैकी एकूण १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून
९०% च्या पुढे अनेक विद्यार्थ्यांनी गुण संपादन केले आहेत.

  • ५९ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले असून
  • ४४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत,
  • २२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर
  • ०५ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मनगिरे, उपाध्यक्षा सुशिलाताई बुचडे, सचिव महादेव बुचडे, सहसचिव वनिता हलगणे, शालेय समिती चेअरमन भिमाशंकर आडके, मुख्याध्यापिका विजया खोगरे, पर्यवेक्षिका सुनिता घाणेगावकर यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

कै. गुरुवर्य भगवानराव बुचडे यांच्याव्दारे १९६१ साली बार्शी शहरातल्या मध्यवर्ती भागात सुरु सुरु केलेले न्यु हायस्कूल       ( सध्याचे कुंकूलोळ हायस्कूल)
हे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी घडवणारी शाळा म्हणूण प्रसिद्ध आहे.

या शाळेतील प्रत्येक वर्षीचे माजी विद्यार्थी प्रशासकीय, वैद्यकीय, स्थापत्य, व्यापार उद्योग अशा सर्व क्षेत्रात उच्च पदावर पोहोचले आहेत.

शाळेने मार्च २०२० शालांत परिक्षेत मिळविलेल्या नेत्रदिपक यशामुळे बुचडे सरांचे स्वप्न साकार झाले . असे मनोगत बुचडे कुटुंबियांनी व्यक्त केले. यशाची ही उज्वल परंपरा भविष्यात सुरु राहणार असा आशावाद ही बुचडे कुटुंबियांनी व्यक्त केला.

  • डोके ऋषीकेश अनंतराव — ९७.६० %
  • आंधळकर स्नेहल दिपक — ९५.४०
  • मनगिरे राजलक्ष्मी रावसाहेब – ९४.४०
  • वाघमारे अजय दत्तात्रय —- ९२.६०
  • अम्रुता सोमनाथ कोरे — ९२
  • रुपाली रामेश्वर वाघमारे — ९२
  • नागेश परदेशी — ९१
  • गणेश ननवरे — ९०
  • ९०% च्या पुढे बरेच विद्यार्थी…
  • एकूण प्रविष्ट – १३१ विद्यार्थी.
  • डिस्टींग्शन – ५९ विद्यार्थी.
  • फस्ट क्लास – – ४४ विद्यार्थी.
  • सेकंड क्लास — 22 विद्यार्थी.
  • पास — ०५ विद्यार्थी.
  • एकूण उत्तीर्ण — १३० विद्यार्थी.
Leave A Reply

Your email address will not be published.