Latest Marathi News

BREAKING NEWS

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी, कोल्हापूर आणि पुण्याच्या मंदिरात नवी नियमावली

0

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग पसरत असल्याचे दिसून येत असल्यामुळे भारतातही कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे आतापर्यंत 4 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता राज्यातही त्यादृष्टीने खबरदारीचे उपाय घ्यायला सुरुवात झाली आहे.

राज्यातील प्रमुख मंदिर प्रशानसनही याबाबत सतर्क झाली आहेत. तसेच त्यासंदर्भात राज्यातील कोल्हापूर, शिर्डी आणि पुणे दगडूशेठ हलवाई या प्रमुख मंदिर प्रशासनाने यासंदर्भात निर्णयही घेतला आहे. कोल्हापूर अंबाबाई माता मंदिर – कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी उद्यापासून मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं निर्णय घेतला आहे.

मात्र, भाविकांना अद्याप मास्क सक्ती करण्यात आलेली नाही. जगभरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना उद्यापासून मास्क सक्तीचा होणार आहे. शिर्डी साईबाबा मंदिर – परदेशातील कोरोनाचे महासंकट पाहता शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क झाले आहे.

दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. तसेच ज्यांनी बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घ्यावेत. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती – पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान मध्ये दर्शनाला जाणार असाल तर आधी मास्क घालावा लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.