पुण्यात चित्रकार रुचिरा विनय मणियार यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनाचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यशक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील इतर अन्य मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
विशिषे म्हणजे या कार्यक्रमाला पवार कुटुंबियांनी हजेरी लावली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार, त्यांचे वडील राजेंद्र पवार, रोहीत पवारांच्या आई सुमित्रा पवार तसेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले.
शिंदे म्हणाले की, ‘माणसामध्ये हातामध्ये, मनामध्ये कला असते. माणूस कितीही कलाकार असला तरी त्याला मार्केट मिळत नाही. पवार साहेबांनी हात लावल्याशिवाय माणसं मोठी होत नाहीत. त्याचे उदाहरण मीच आहे. मला पवारांनी हात लावला आणि मी मोठा झालो’, अशा शब्दांत सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांचे कौतुक केले.
शरद पवार यांनीदेखील यावेळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘या ठिकाणी माझे अनेक जुने मित्र उपस्थित आहेत. आम्ही पुण्यात एकत्र शिकलो. आमच्या क्षेत्रात वेगळे काहीतरी करणारे आम्ही मित्र होतो. श्रीमती गांधी यांनी माझी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. आणि आम्ही नवीन पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा निवडणुका लागल्या आणि तिकिट वाटपावेळी साताऱ्याच्या जागेसाठी मला श्रीनिवास पाटील यांच्या नावाची आठवण झाली. मध्यंतरी त्यांना आम्हाला तिकिट देता आलं नाही, असे शरद पवार म्हणाले.