कोल्हापूर | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदरांसह बंडखोरी करत सरकार स्थापन केले. यानंतर काल उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का देत 12 खासदार बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार ही शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाल पूर्ण कलाटणी मिळाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार संजय मंडलीक आणि खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या बंडाने कोल्हापूरमध्ये पुढचा खासदार कोण यावर चर्चा रंगली आहे. सध्या कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संजय मंडलीक यांच्या विरोधात हसन मुश्रीफ यांच्यानावाची चर्चा जोरदार रंगली आहे. 2019 च्या निवडणूकीत संजय मंडलीक शिवसेनेतून खासदार झाले त्यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पाठबळ दिल्याने त्यांची निवडणूक अत्यंत सोपी गेली होती.
मात्र संजय मंडलीक शिंदे गटात सामील झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय समिकरणे पूर्ण बदलली आहे. जिल्हा बँक, गोकुळ, बाजारसमित्या, महानगरपालिकेत मुश्रीफ आणि बंटी पाटील यांची आघाडी आहे. या आघाडीत खासदार मंडलीकही होते त्यामुळे खासदार मंडलीक या सगळ्यापासून दूर गेल्याने 2024 चा खासदार कोण हा प्रश्न उभा राहिला आहे.
कागल तालुक्यातील आमदार हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलीक यांच्यात मागच्या कित्येक वर्षांपासून वाद आहे. परंतु मागच्या दोन वर्षांत त्यांच्यातील वाद थोड कमी होत ते एका विचारमंच्यावर येत होते परंतु २०२४ लोकसभेची लढतच या दोघांमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्याला परिचीत असलेला मंडलीक मुश्रीफ वाद पुन्हा पहायला मिळण्याची शक्यता आहे.