Latest Marathi News

BREAKING NEWS

“२०२४ मध्ये निवडून यायची खात्री नाही, म्हणून दानवे भ्रमिष्टासारखे बोलतायत”

0

 

शिवसेना नेते यांनी शिवसेनाबरोबर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह केलेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यकारभार सुरू केला असला, तरी राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे तीव्र झाले आहेत.

यातच आता भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप-शिवसेना युतीसंदर्भात केलेल्या विधानांमुळे वेगळीच राजकीय चर्चा रंगू लागली आहे. मात्र, २०२४ मध्ये होणाऱ्या पुढील लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्याची खात्री नसल्यामुळे रावसाहेब दानवे भ्रमिष्टासारखे बोलत असल्याचे प्रत्युत्तर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.

भाजप-शिवसेना दरम्यान २०१९ मध्ये झालेल्या युतीच्या बैठकीदरम्यान ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री ठरले होते, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. संजय राऊतांनी हा दावा खोडून काढला. २०१९ च्या बैठकीदरम्यान ५०-५० टक्के म्हणजेच अडीच वर्ष शिवसेना-अडीच वर्ष भाजपाचा मुख्यमंत्री असे ठरले होते. मात्र रावसाहेब दानवे हे सध्या जालन्याचे खासदार आहेत. २०२४ मध्ये निवडून येतील की नाही, याची खात्री नाही. त्यामुळे ते असे भ्रमिष्टासारखं बोलत आहेत, या शब्दांत संजय राऊत यांनी पलटवार केला.

Leave A Reply

Your email address will not be published.