मुंबई | मुंबई मनपा कोविड घोटाळ्या प्रकरणी मागील तीन दिवसात ईडीने जवळपास 16 ते 17 ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ईडीने ठाकरे गटाशी संबंधितांच्या मागे चौकशीचा ससेमिरा मागे लावला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरीही छापेमारी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाची कोंडी केली जात असल्याने आता ठाकरे गटही आक्रमक झाला आहे.
ईडीने मागच्या तीन दिवसात ठाकरे गटाशी संबंधित सुजीत पाटकर, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त रमाकांत बिरादार आणि वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली. पुण्यातही कोविड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडालेली असतानाच आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा ईडीच्या रडारवर आल्या आहेत.
तीन दिवसात ठाकरे गटाशी संबंधित सुजीत पाटकर, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, उपायुक्त रमाकांत बिरादार आणि वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली. पुण्यातही कोविड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली. त्यामुळे खळबळ उडालेली असतानाच आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा ईडीच्या रडारवर आल्या आहेत.
दरम्यान, कोव्हिड घोटाळा झाला तेव्हा यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. टेंडर प्रक्रिया आणि प्रस्ताव मंजूर करून घेणे याचा थेट संबंध स्थायी समितीशी येत असतो. स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच तो सभागृहात येतो आणि सभागृहात महापौर तो प्रस्ताव मंजूर करत असतात. असं असताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना चौकशीसाठी का बोलावलं जात नाही? असा सवाल शिवसैनिकांमधून केला जात आहे. सध्या यःस्वान्त जाधव हे शिंदे गटात स,ही असल्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावले जात नाही अशी चर्चा होत आहे.