Latest Marathi News

BREAKING NEWS

खासदार नवनीत राणा यांना कोर्टाचा दणका; वडील फरार म्हणून घोषित

0

मुंबई | सतत उद्ध्दव ठाकरे यांच्यावर टीका करून नेमीचं चर्चेत राहणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडीलांना शिवडी कोर्टाने मोठा दणका दिला आहे. जात पडताळणी प्रकरणात खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर यांना शिवडी कोर्टाकडून फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासोबतच नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

माहितीनुसार, सुप्रीम कोर्ट आणि मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेले प्रकरण दोन्हीही वेगवेगळे असल्याचे निरीक्षण शिवडी कोर्टाने नोंदवले आहे. कोर्टाने आता एक महिन्याची मुदत दिली आहे. जर या कालावधीत हजर न झाल्यास प्रॉपर्टी जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच, याप्रकरणाची पुढील सुनावणी आता १६ फेब्रुवारीला होणार आहे. सध्या बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

याबाबतचे नेमके प्रकरण असे आहे की, नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिला. त्यामुळे नवनीत राणा यांचे वडिल हरभजन सिंग कौर यांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. त्यामुळे नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर अदयाप नवनीत राणा यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये

Leave A Reply

Your email address will not be published.