Latest Marathi News

BREAKING NEWS

केतकी चितळे पुन्हा अडचणीत? ‘ती’ वादग्रस्त पोस्ट विरोधात सचिन खरात आक्रमक

0

मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेत्री ‘केतकी चितळे’ ही तिच्या अभिनयापेक्षा वेगळ्याच कारणाने नेहमी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील काही पोस्ट अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. केतकीच्या काही अशाही पोस्ट आहेत ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले आहे. नुकतंच अभिनेत्रीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने ‘जातीयवाद, सनातनी हिंदू’ अशा प्रकारचा मुद्दा मांडला आहे. यामुळे आता केतकी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनी केतकीच्या या पोस्टची दखल घेत सरकारने तात्काळ तिच्यावर कायदेशीर कारवाई अशी मागणी केली आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये केतकीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रया देखील दिल्या आहेत. त्यापैकी एकाने तिला भीमा कोरेगाव शौर्यदिनाबद्दल विचारलं असल्याचं दिसून येत आहे.

“तमाम भारतीयांना भीमा कोरेगाव शौर्य दिनी शुभेच्छा द्याल, असे वाटले होते. तुमच्याकडून आजचा दिवस दुर्लक्षित होणे अनपेक्षित आहे.’ असं एका नेटकऱ्याने म्हटलं. यावर केतकी म्हणाली, “भीमा कोरेगाव म्हणजे तीच जागा जिथे ब्रिटिश सैन्यातील तुकडी पेशव्यांच्याविरोधात लढली? ब्रिटिश सरकारच्या बाजूने मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना मी शुभेच्छा देण्याची तुम्ही अपेक्षा ठेवता म्हणजे एक तर तुम्हाला मी राष्ट्रद्रोही वाटते किंवा तुम्हाला खरा इतिहास माहिती नाही.

यातील नेमके काय, असा सवाल तिने विचारला आहे.’ आणि आता धागा पकडून सचिन खरात यांनी अभिनेत्री केतकी चितळेवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा अशी मागणी केली आहे. दरम्यान, केतकीने आपल्या या व्हिडिओमध्ये अनेक सामाजिक आणि जातीवाचक व्यक्तव केलं असल्याचं दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.