Latest Marathi News

BREAKING NEWS

केसरकरांना मातोश्रीवर घेऊन गेल्याचा पश्चाताप, सुभाष देसाईंचा जोरदार टोला

0

मुंबई | शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर हे उद्धव ठाकरे गटाच्या टीकेला सडेतोड प्रतिउत्तर देताना दिसून आले आहेत अशातच आता राष्ट्र्वादीसोडून शिवसेन्ट प्रवेश देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेनेत प्रवेश दिला जावा म्हणून मंत्री दीपक केसरकर हे माझ्याकडे आले होते. अनेकजण येतात तसे केसरकर ही आले होते. म्हणून मी त्यांना मातोश्री वर घेऊन गेलो पण आज मला केसरकर यांना मातोश्रीवर घेऊन गेलो यांचा पश्चाताप होत आहे.

तसेच दहशतवादाची लढाई लढायला शिवसेनेत आले आणि आत त्याच्याच मांडीवर जाऊन बसले अशी जोरदार टिका माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. ते सावंतवाडीतील आदी नारायण मंगल कार्यालयात रविवारी उद्धव ठाकरे गटाकडून शिवगर्जना सभेत ते बोलत होते. यावेळी लोकसभा सर्पक प्रमुख प्रदीप बोरकर, अतुल रावराणे, जिल्हाप्रमुख संजय पडते महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, चंद्रकांत कासार, रूपेश राऊळ, बाळा गावडे आदी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करत होतो. आज जरी बाळासाहेब नसले तरी त्याच ताकतीने पक्ष वाढण्यासाठी काम करत आहे. जरी चिन्ह आणि पक्षाचे नाव विरोधकांनी चोरले असले तरी ही संपत्ती पुन्हा आपल्या पक्षाला मिळावी यासाठी अहोरात्र झटणार आहे. नंतर माझे डोळे मिटले तरी चालतील अशी भावनिक साद देसाई यांनी उपस्थित सैनिकांना घालत सैनिक हीच उद्धव ठाकरे यांची ताकद आहे त्यामुळे सर्वानी एकदिलाने काम करा असे आवाहनही केले.

Leave A Reply

Your email address will not be published.