Latest Marathi News

BREAKING NEWS

काय सांगता | शिंदे गटाला मिळणार रिक्षा? तब्बल ६ पर्याय पाठवले

0

शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये पक्षचिन्हावरून जोरदार चढाओढ सुरू आहे. शिवसेनेला मशाल पक्षचिन्ह मिळाले आहे.
त्यामुळे शिवसैनिकांनी एकच जल्लोष सुरू केला आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला अजूनही पक्षचिन्ह मिळालेले नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शिंदे गटाला रिक्षा चिन्ह मिळणार अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. अखेर शिंदे गटाकडून आज शंख, रिक्षा, तुतारी फुंकणारा माणूस ही चिन्हं निवडणूक आयोगाकडे सादर केल्याी माहिती समोर आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव आणि ‘धगधगती मशाल’ हे निवडणूक चिन्ह दिले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव बहाल केले. मात्र, शिंदे गटाला कोणतेही चिन्ह मिळू शकलेले नाही. शिंदे गटाने त्रिशूळ, उगवता सुर्य आणि गदा असे चिन्ह दिले होते. पण, आयोगाने ते रद्द ठरवले. आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे निवडणूक पर्यायी चिन्हांचा प्रस्ताव पाठवला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मुक्त चिन्हांऐवजी नवीन चिन्हांचा पर्याय देण्याचा एकनाथ शिंदे गटाचा प्रयत्न आहे. शंख, रिक्षा, तुतारी फुंकणारा माणूस ही चिन्हं सादर केली आहे.तसंच, सूर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड या देखील चिन्हाचा प्रस्ताव दिला आहे. याआधी निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून नव्याने तीन चिन्ह द्यायला सांगण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.