Latest Marathi News

BREAKING NEWS

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता लागू, कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?

0

मुंबई | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची रणधुमाळी दिसून येत आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलं असून शिवसेनासह भारतीय जनता पक्षाने आपली कंबर कसली आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळं शिवसेनेच्या दृष्टीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राज्याच्या राजकारणातील बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

शिवेसेनेतील दोन गट ठाकरे समर्थक असलेला शिवसेना : ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे गट’ आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असलेला शिंदे गट. हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. शिवसेनेतील बंडाचा प्रभाव अंधेरीतील पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे.

निवडणूक आयोगानं अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. त्यामुळे 3 ऑक्टोबरपासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदार संघ क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 1 जानेवारी 2022 रोजीच्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख : 7 ऑक्टोबर 2022
नामनिर्देशन पत्रं सादर करण्याची अखेरची तारीख : 14 ऑक्टोबर 2022
नामनिर्देशन पत्रांची छाननी : 15 ऑक्टोबर 2022
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम तारीख : 17 ऑक्टोबर 2022
मतदानाचा तारीख : 3 नोव्हेंबर 2022
मतमोजणीचा तारीख : 6 नोव्हेंबर 2022

Leave A Reply

Your email address will not be published.