Latest Marathi News

BREAKING NEWS

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला शरद पवार अजित पवार यांचं एकत्रित अभिवादन

0

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सातारा दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 64वी पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातील सेवक वर्ग मोठ्या संख्येने त्यांना अभिवादन करण्यासाठी साताऱ्यात येतात. शरद पवार आणि अजित पवार यांनीही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला अभिवादन केलं. या दोन्ही नेत्याच्या एकत्रित दिसल्यामुळे नव्या चर्चाना उधाण आले आहे.

त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थिती लावली. यावेळी देणगीदार रामशेठ ठाकूर शकुंतला ठाकूर यांचा सत्कार करण्यात आलं. सोबतच गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात अजित पवार यांचाही शरद पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमानंतर शरद पवार पत्रकार परिषदही घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार प्रथमच सातारा दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागलं आहे. शरद पवार सातारा दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाच्या निमित्ताने पवारांचा हा दौरा असला तरी राजकीय पटलावर या दौऱ्याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.