मागच्या काही दिवसांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानं या चर्चेवर पडदा पडल्याचं चित्र होतं. परंतु वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या भव्य खुलाशामुळे अजित पवार हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजपमध्ये येतो म्हणत अजित पवार यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची दोन वेळा फसवणूक केल्याचा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या या गौप्यस्फोटामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. त्यांनी अजित पवार यांच्याबाबत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपमध्ये येतो म्हणत अजित पवार यांनी दोनदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची फसवणूक केल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. ते पिंपरी -चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हा खुलासा केला आहे. .
दरम्यान दुसरीकडे अजित पवार हे भाजपच्या संपर्कात नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीकडून अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं. अजित पवार हे गेल्या चार महिन्यांपासून माझ्या संपर्कात नव्हते. ते आमच्या दुसऱ्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नव्हते. राष्ट्रवादीमध्ये मागच्या तीन दिवसांत जे काही झालं ती सगळी स्क्रिप्ट होती. शरद पवार साहेबांनी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी घटना बदलली. राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत.