Latest Marathi News

BREAKING NEWS

ज्युनियर एनटीआर ऑस्करच्या प्रीडिक्शन यादीत स्थान मिळवणारा पहिला अभिनेता ठरला

0

भारतीय चित्रपटातील अनेक कलाकारांचे गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांनी त्यांच्या ऑनस्क्रीन कामगिरीचे कौतुकदेखील केले आहे. ज्युनियर एनटीआर हा या पिढीतील अभिनेत्यांपैकी एक आहे. एसएस राजामौली दिग्दर्शित आर.आर.आर यांच्या चित्रपटातून ज्युनिअर एनटीआरचे देशातच नाही तर जगभरातून कौतुक होत आहे.

ज्युनिएर एनटीएरचा आरआरआर या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. आर.आर.आर चित्रपटाची ऑस्करसाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर याच चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता ज्युनिअर एनटीआरला प्रसिद्ध व्हरायटी मॅगझीनने टॉप 10 कलाकारांमध्ये स्थान दिले आहे. खरंतर, ही यादी अजून जाहीर करण्यात आली नाही. मात्र, या मॅगझीनच्या अंदाजानुसार ज्युनिअर एनटीआर टॉप 10 च्या यादीत आपलं स्थान मिळवू शकतो. असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

RRR स्टारने ऑस्करमध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’साठी व्हरायटीच्या टॉप 10 यादीत स्थान मिळवले आहे. तो ह्यू जॅकमन (द सन) आणि विल स्मिथ (एमॅन्सिपेशन) या सारख्यांमध्ये सामील होतो. ज्युनियर एनटीआरला याची माहिती मिळताच, ‘ऑस्करसाठी आरआरआर’ ट्विटरवर ट्रेंड करू लागला. ऑस्टिन बटलर एल्विसमधील त्याच्या कामासाठी यावर्षी हा पुरस्कार जिंकेल, असा अंदाजही वर्तवला आहे.

इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीय अभिनेत्याने ऑस्कर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या अंदाजानुसार, टॉप 10 अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. या मॅगझीनने आपल्या भविष्यकालीन यादीत एसएस राजामौली यांचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून समावेश केला आहे. भारतासाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे. एनटीआर आणि राजामौलीचे चाहतेदेखील या बातमीमुळे फार खुश आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.