काही दिवसांपासून राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अगोदर ‘हर हर महादेव’ सिनेमावर आक्षेप घेऊन ठाण्यात विवियाना मॅालमध्ये गोंधळ घातला होता. या प्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंब्रा येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आता. या दोन्ही प्रकरणी आपल्यावर खेटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप आव्हाड यांनी ट्विटरच्या मध्यमातून दिला आहे.
जितेंद्र आव्हाड ट्विटमध्ये म्हणाले की, ‘हर हर महादेव’ चित्रपटादरम्यान विवियाना येथे झालेल्या गदारोळ प्रकरणातील तक्रारदार परिक्षित धुर्वे ह्याला मनसेच्या ठाण्यातील वरिष्ठ नेत्याने महाराष्ट्रातील एका वरिष्ठ नेत्याशी बोलणं करुन दिलं आणि त्या दोघांनी मिळून तक्रारदाराच्या पत्नीला माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करण्यास सांगितले, असा आरोप आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून केला.
मी त्या ताईचा आभारी आहे, कि त्या ताईने स्वत:हून सांगितले, कि मी असला घाणेरडा गुन्हा दाखल करु शकत नाही. आणि आपल्या मतावर ती ठाम राहिली. घोडबंदरचा एक नगरसेवक ह्या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी होता. म्हणजे माझ्यावर 354 चा गुन्हा दाखल करायचा हे कधीपासून ठरलं होतं ते बघा, असेही ते म्हणाले.आव्हाडांच्या आरोपावर मनसेकडून काय प्रत्युत्तर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.