बार्शी |
बार्शी शहरातील व्यावसायिक सुरेंद्र हंचाटे व त्यांची पत्नी सौ.लीना हंचाटे यांच्या हस्ते अन्नपूर्णा महाप्रसादाची पूजन ३० नोव्हेंबर रोजी करण्यात आली. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातही हंचाटे कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग असतो, त्यांचा मुलगा भाविन हा उच्च शिक्षित असून कॅम्पुटर इंजिनियर आहे.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेल्या काही वर्षापासून बार्शी शहरांमध्ये विविध क्षेत्रातील दानशूर यांच्या मदतीने अविरत सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून सुमारे २०० लोकांना दोन वेळचे भोजनाची निशुल्क सेवा घरपोच केली जाते शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होत आहे. गेल्या सात आठ वर्षापासून हा अनोखा उपक्रम मातृभूमी प्रतिष्ठान अविरतपणे राबवत आहे, व त्याला लोकांची मदत व पाठिंबाही मिळत आहे.