Latest Marathi News

BREAKING NEWS

‘जमत नसेल तर ठाकरे कुटुंबाने महाराष्ट्रात राहूच नये’

0

पुन्हा एकदा भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबियनवर निशाणा साधला आहे. मुंबई किंवा महाराष्ट्रात राहायचे असेल तर हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारचा मानसन्मान करावाच लागेल. सरकारकडून सुरक्षा, फायदे अन् पैसे घ्यायचे आणि सरकारवर टीकाही करायची, असे आता चालणार नाही. जर जमत नसेल बॅगा भरून तुमच्या आवडत्या शहरात निघून जा, असा इशारा नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला दिला आहे.

आमदार नितेश राणे म्हणाले की, मी आमदार असलो, कोकणातून निवडून आलो असलो तरी मुंबईत माझे वास्तव्य आहे. मुंबईसाठी भाजपने ३८ हजार कोटींचे प्रकल्प उभे केले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईकरांना भेट देणार आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या दूरदृष्टीने मेट्रो मुंबईला मिळाली. देशाची आर्थिक राजधानी मुंबई हे केवळ लिहिण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी ठेवले होते. पण आज मुंबईला खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात होत असल्याचे ते म्हणाले.

त्याचसोबत घटनाबाह्य सरकार असल्याची ओरड करायची आणि सरकारने दिलेल्या सुविधा वापरायच्या. सुरक्षा वापरायची, सामनाच्या पहिल्या पानावर सरकारची जाहिरात करायची आणि पैसे मिळवायचे. तुम्हाला थोडी तरी लाज राहिली असेल आणि स्वाभिमान उरला असेल तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने सरकारकडून काही घ्यावेच नाही. पैसे घेणार नाही असे जाहीर करावे. ही हिंमत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आहे का? असा सवाल नितेश राणेंनी विचारला.

Leave A Reply

Your email address will not be published.