बिग बॉस मराठीचा चौथा सीजन पार पडला. दरवर्षीप्रमाणे हा सीजनसुद्धा जोरदार वादाचा ठरला. शोमध्ये अनेक वादविवाद, राडे, मैत्री आणि प्रेमसुद्धा पाहायला मिळालं. अभिनेता-स्पर्धक अक्षय केळकर यंदा महाविजेता ठरला. परंतु बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांची तुफान चर्चा झाली. त्यातीलच एक स्पर्धक म्हणजे कोल्हापूरची लवंगी मिर्ची अभिनेत्री अमृता धोंगडे होय. अमृताने बिग बॉसच्या घरात टॉप 4 मध्ये मजल मारली होती. ‘बिग बॉस मराठी’चं यंदाचं सीजनसुद्धा तुफान लोकप्रिय ठरलं.
मध्यंतरी काही टीकासुद्धा झाल्या. परंतु एकंदरीत बिग बॉस मराठीचा धमाकेदार शेवट झाला. अक्षय केळकरने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या पर्वाची उपविजेती ठरली होती. या सीजनच्या टॉप 4 मध्ये अभिनेत्री आणि कोल्हापूरची लवंगी मिरची म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अमृता धोंगडेने आपलं स्थान निर्माण केलं होतं. नुकतंच अमृताची नवी पोस्ट चर्चेत आली आहे. अभिनेत्री बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर आपल्या गावी कोल्हापूरला आणि तिथून ज्योतिबा दर्शनाला पोहोचली आहे. याबाबत अभिनेत्रीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
बिग बॉस मराठीमुळे सहभागी झालेल्या स्पर्धकांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. या शोमुळे स्पर्धकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत झळकलेले अभिनेत्री अमृता धोंगडेसुद्धा बिग बॉस मराठीमुळे प्रचंड चर्चेत आली होती. बिग बॉसचा सीजन संपल्यानंतरसुद्धा अमृता अजूनही चर्चेत आहे. अमृता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. अभिनेत्री सतत आपल्या विविध पोस्ट शेअर करत. चाहत्यांना आपल्या अपडेट्स देत असते.