Latest Marathi News

BREAKING NEWS

“बारावी नापास”चा शिक्का पुसून इतिहास घडविणारा आय.पी.एसृ.अधिकारी!

0

 

“बारावी नापास”चा शिक्का पुसून इतिहास घडविणारा आय.पी.एस् अधिकारी!

(राजा माने/खमक्या इंडिया नेटवर्क)

मुंबई:–महामारीने निर्माण झालेल्या परिस्थिती मुळे प्रकाशन व व्यक्तीचित्र प्रदर्शन पुढे जात असलेल्या माझ्या *ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..* या पुस्तकातील अनेक दिग्गजांपैकी.. * *मान्यवर मानकरी- डॉ.मनोजकुमार शर्मा:-“बारावी नापास”चा शिक्का पुसून इतिहास घडविणारा  आय.पी.एसृ.अधिकार अकरावी पर्यंत कॉप्या करून पास झालेला अन् बारावीला कॉपी करता आली नाही म्हणून नापास झालेला कॉपी बहाद्दर!.. जीवनाच्या या सरधोपट मार्गावर त्याची वाटचाल सुरु असते..पण काही नाट्यमय घटना त्याच्या जीवनाला कलाटणी देतात.. आणि… *हारा वही, जो लढा नही!* या जीवनमंत्राशी त्याचे नाते जडते.. प्रामाणिकपणा, ध्येयनिष्ठा, जिद्द, आणि कठोर परिश्रमाच्या आयुधांसह जीवनाच्या लढाईस सज्ज होतो.. पत्नीच्या प्रेमाखातर चक्क थेट आयपीएस अधिकारीच बनतो… एखाद्या सिनेमाची कथाच वाटावी असा जीवनपट असलेल्या त्या तरुणाचे नाव आहे मनोजकुमार शर्मा! *‌ बारावी नापास हा शिक्का पुसून टाकत त्यांनी केवळ प्रगतीचाच इतिहास घडविला असे नाही तर कर्तव्यनिष्ठेला संवेदनशिलता आणि माणुसकीची जोड दिली.मध्य प्रदेशातील मुरैना येथे जन्मलेल्या मनोजकुमार कायद्याची पदवी तर मिळविलेली आहेच शिवाय “हिंदी पत्रकारितेचा इतिहास”या विषयात डॉक्टरेट देखिल मिळविली आहे.”ट्वेल्थ फेल”ही त्यांनी स्वतःच्या जीवनावर लिहिलेल्या कादंबरीचे हिंदी साहित्य जगतात जबरदस्त स्वागत झाले.सचिन तेंडुलकर, ख्यातनाम सिनेदिग्दर्शक विशाल भारद्वाज,अभिनेता आशुतोष राणा आणि “सुपर ३०”चे संस्थापक आनंदकुमार सारख्या मान्यवरांनी या कादंबरीचे तोंड भरुन कौतुक केले. “ॲमेझॉन’वर ही कादंबरी विक्रीचे नवे उच्चांक प्रस्थापित करीत आहे.२००५ घ्या आयपीएस बॅचचे ते आहेत.राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, कोल्हापूर, नागपूर आणि मुंबईतील विविध पदांवरील आजवरची कारकीर्द लोकाभिमुख आणि लक्षवेधी राहिली आहे. त्यांच्या पत्नी श्रध्दा जोशी-शर्मा आय.एफ.एस् अथिकारी आहेत..जिंदादिल डॉ.मनोजकुमार शर्मा यांचा आज वाढदिवस… त्यांना खूप खूप शुभेच्छा!.*

  1. -राजा माने,
    *संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र

*”ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”*
लेखक: *राजा माने*
———————————-
प्रकाशक: *दत्ता थोरे, संतोष पवार*
(प्रगती प्रकाशन)
चित्रकार: *नितीन खिलारे*
मुखपृष्ठ: *सचिन खरात*
………………………………….

Leave A Reply

Your email address will not be published.