डॉ. सतीश पावडे यांची डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या सल्लागारपदी नियुक्ती
(खमक्या इंडिया नेटवर्क)
मुंबई:- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, समीक्षक आणि माजी संपादक, पत्रकार डॉ. सतीश पावडे यांची डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक आणि अध्यक्ष तसेच नामवंत विचारवंत, पत्रकार,संपादक राजा माने यांनी ही नियुक्ती केली आहे.
डॉ. सतीश पावडे यांनी १९८० मधे पत्रकारितेची कारकिर्द सुरू केली होती. नागपूर पत्रिका, नागपूर टाईम्स, लोकमत, जनवाद, राष्ट्रदूत, महाविदर्भ आदी दैनिक तसेच महाराष्ट्र या पाक्षिकामध्ये पत्रकार, संपादक, कार्यकारी संपादक, साहित्य संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यानी काम केले आहे. साहिल मिडिया कन्सलटन्सीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून, रिलायंस कम्युनिकेशन्स, रिलायंस ईन्फोकाँम या काँर्पोरेट कंपन्यामधेही काँर्पोरेट अफेयर्स विभागाचे कोआँर्डिनेटर म्हणून काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या जवळ आहे.
खाजगी, दुरदर्शनसाठी तसेच शासनासाठीही त्यानी अनेक डाँक्युमेंट्रीज आणि डाँक्युड्रामाजची निर्मिती-लेखन-दिग्दर्शन केले आहे. त्यांचे नाटक, चरीत्र आणि समीक्षा विषयक २४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.रंगभूमी आणि लेखन कार्यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी सेन्साँर बोर्डाचे सदस्य म्हणून, मराठी विश्वकोषाच्या नाटक ज्ञान मंडळाचे सल्लागार सदस्य म्हणून ते काम करीत आहेत.संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचेही ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
वर्धा येथील महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या परफाँर्मिंग आर्ट्स (फिल्म अँड थिएटर) विभागात ते वरिष्ठ सहायक प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.