बार्शी :
फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने पोलीस बांधवांचा स्नेह मेळावा आयोजन करून जागतिक फोटोग्राफर दिन साजरा करण्यात आला. यावेळी नुतन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपस्थित होते. यावेळी, पजोटोग्राफरच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं.
“सद्राक्षणाय खलनिग्रहनाय” असं म्हणत कायम समाजात शांतता राहावी.समाज कायम गुन्हेगारी आणि भय मुक्त राहावा यासाठी पोलीस बांधव सदैव तैनात असतात. आपण आपल्या घरी सण उत्सव आनंदाने साजरे करतो. कारण आपले पोलीस बांधव – भगिनी आपल्यासाठी दिवसरात्र काम करतात. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून शुक्रवारी बार्शी फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर असोसिएशनच्या वतीने बार्शी शहर स्टेशनच्या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी पो. नि. आण्णासाहेब मांजरे यांनी आपल्या मनोगतात फोटोग्राफर असोसिएशनला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच पोलीस बांधवांनाही असोसिएशनने सामजिक सहकार्य करावे ही विनंती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश दहिहंडे यांनी केले. तर आभार असोसिएशनचे अध्यक्ष जमीर कुरेशी यांनी मानले. असोसिएशनच्या वतीने सर्व पोलीस बांधवांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी यांनी परिश्रम घेतले.
BREAKING NEWS
- कौटुंबिक स्तरात शाश्वत आनंद, समृद्धी व आत्मिक समाधान कशात ?
- नागपूरमध्ये विधानभवनात अविनाश सोलवट यांची भेट
- कलियुगात प्रचिती दातृत्वाची.!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोंढवा बु. भागातील मुख्य रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
- कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- “आशा” योजनेच्या माध्यमातून ७०० हून अधिक रुग्णांवर मोफत जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, चंद्रकांत दादा पाटील यांची अपोलो प्रतिनिधींशी भेट
- अपोलो हॉस्पिटलचे CEO तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट