Latest Marathi News

BREAKING NEWS

इब्राहीम खान बरोबर असलेल्या नात्यावर पलक तिवारीने केला खुलासा

0

अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी मागच्या एक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत सुपरस्टार सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून पलक तिवारी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे तर सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत पलक लग्न करणार असल्याच्या चर्चांवर आता स्वःताहा पलकनेच खुलासा केला आहे.

श्वेता तिवारीची मुलगी इब्राहिम आणि पलक यांच्यातील नातं बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. दोघे गेल्या वर्षी पहिल्यांदा एकत्र दिसले होते आणि पापाराझींनी त्यांचे फोटो शेअर केले होते. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा पलकला तिच्या इब्राहिमला डेट करण्याच्या बातम्यांबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, “प्रेमाचा अंदाज कधीच बांधता येत नाही, सध्या काम ही माझी पहिली प्राथमिकता आहे.

पुढे बोलताना पलक म्हणाली की, माझ्या करिअरसाठी हा महत्त्वाचा काळ आहे, त्यामुळे मी माझा फोकस त्या दिशेने ठेवणार आहे.” पलक आणि इब्राहिम पापाराझींनी क्लिक केलेल्या फोटोंमधून त्यांचे चेहरे लपवण्याचा प्रयत्न करत होते. अभिनेत्री इब्राहिमला डेट करण्याबद्दल बोलली आणि म्हणाली, “आम्ही अधूनमधून बोलतो पण मी कोणाला डेट करत नाहीये. माझा असा काही मूड नाहीये असे तिने यावेळी म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.