मुंबई : हाथरस गावात घडलेल्या कथित बलात्कार आणि खून प्रकरणावर संपूर्ण देशातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आरोपींना फाशी देण्याची मागणीदेखील सर्व स्तरातून होताना दिसत आहे. अशातच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करणार्या कंगणानेदेखील आपली प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
मला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. हैद्राबाद येथे प्रियंका रेड्डी बाबतीत जसा न्याय झाला तसाच न्याय हाथरसच्या निर्भया बाबतीत व्हावा असे मत कंगणाने व्यक्त केले आहे. हाथरस येथे घडलेल्या कथित बलात्कार आणि खून प्रकरणावर कंगणाने इतके दिवस प्रतिक्रिया न दिल्याने तिच्यावर टीका होत होती. मात्र तिने आज आपले मत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1311164264799899649?s=20
दरम्यान, हैद्राबाद येथे देखील असा देशाला हदरवून सोडणारा अपराध घडला होता. एका मुलीवर बलात्कार करून तिला जीवंत जाळण्यात आले होते. यावेळी देखील संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. आरोपींना अटक देखील झाली होती मात्र पहाटे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सर्वच आरोपींचा पोलिस एनकाऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. कंगनाच्या मते हाथरस प्रकरणात देखील असेच व्हायला हवे.