एआययूडीएफ अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी हिंदू मुलांच्या लग्नाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. या वेळी त्यांनी लहान वयात मुलींचे लग्न लावून देण्याचे समर्थन करत हिंदूंनी त्यांच्या मुलींचे लग्न 18-20 वर्षात केले पाहिजे आणि त्यांनी मुस्लिम फॉर्म्युला पाळला पाहिजे, असा सल्ला देखील यावेळी दिली आहे.
मुलीचं वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यास तिच्या लग्नाला सरकारने परवानगी दिली आहे. ते (हिंदू) लोक ४० वर्षांपर्यंत लग्न करत नाहीत. या काळात दोन-तीन बेकायदेशीर बायका ठेवतात. त्यांना मुलं होऊ देत नाहीत. ते आपला खर्च वाचवतात. एकप्रकारे ते चेष्टा करतात. ४० वर्षानंतर आई-वडिलांनी लग्नासाठी प्रवृत्त केलं किंवा ते कुठे अडकले तर ते लग्न करतात, असं बदरुद्दीन अजमल यांनी म्हटलं आहे.
यादरम्यान, ४० वर्षानंतर मूल जन्माला घालायची त्यांच्यात क्षमता कुठे राहते? तेथून पुढे मूल जन्माला घालायचं आणि त्याला वाढवायचं, अशी आशा ते कसं काय ठेवू शकतात? योग्य वयात लग्न झाल्यास सर्व गोष्टी योग्य होऊ शकतात, असं ते म्हणाले त्यामुळे मुस्लिमांचा हा फॉर्म्युला तुम्हीही मान्य करायला हवा. आपल्या मुलाचं लग्न २० ते २२ वर्षात आणि मुलीचं लग्न १८ ते २० वर्षात करावं, मग बघा तुमच्यातही अनेक मुलं जन्म येतील, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.