Latest Marathi News

BREAKING NEWS

“हिम्मत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या, तुम्हाला तुमची.” विजय शिवतारे यांचा राऊतांना टोला

0

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत थेट शिंदे गटावर घणाघाती टीका करताना दिसून येत असून थेट खोके सरकार आणि चोर अशा शब्दाचा वापर करून राऊत हे सतत शिंदे गटावर निशाणा साधलाय दिसून येत आहे. त्यातच सर्व चोर लफंगे शिंदे गटात गेले आहेत. हा कचरा होता पानगळ होती आता ती शिंदे गटात गेली आहे अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. आता शिंदे गटाकडून या टीकेला उत्तर देण्यात आले आहे.

हिम्मत असेल तर पुढील १२ तासात राजीनामा द्या मग तुम्हाला तुमची लायकी कळेल असे आव्हानच राऊत यांनी देण्यात आले आहे. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिले. “जर आम्ही तुम्हाला कचरा वाटत असू तर उद्याच खासदारकीचा राजीनामा द्या आणि राज्यातील कोणत्याही भागातून निवडून येऊन दाखवा. तुम्हाला तुमची लायकी कळेल”. अशी टीका शिवतारे यांनी केली आहे. शिंदे गटात गेलेले आमदार खासदार हे कचरा आहेत पानगळ आहेत असं विधानं संजय राऊत यांनी केलं होत.

याच आमदार आणि खासदारांच्या जोरावर तुम्ही राज्यसभेत गेला आहात. मीही तुम्हाला दोनदा मतदान केलं आहे. मलाही तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. आम्ही एव्हढाच कचरा वाटत असू तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. बाष्कळ बडबड करू नका, तुमचा चेहरा पाहून जनतेला विट आलाय असं स्पष्ट मत यावेळी शिवतारे यांनी व्यक्त केले. यावर आता राऊत काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.