Latest Marathi News

BREAKING NEWS

‘काळाची चाके उलटे फिरवत माजी संस्थानिकांचे हक्क मान्य करत सर्वोच्च न्यायालयाचा धक्कादायक निर्णय.

0

‘काळाची चाके उलटे फिरवत माजी संस्थानिकांचे हक्क मान्य करत सर्वोच्च न्यायालयाचा धक्कादायक निर्णय.

मुंबई : केरळमधील पद्मनाभस्वामी मंदीराच्या तळघरात सापडलेल्या खजिन्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
देशातील सर्व संस्थाने बरखास्त केल्यानंतर, खाजगी संपत्ती वगळता, इतर सर्व मालमत्ता देशातील जनतेच्या मालकीची असे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पद्मनाभास्वामी’ मंदीराच्या मालकी/ व्यवस्थापनाचे संपुर्ण हक्क त्रावणकोर माजी संस्थानीक कुटुंबीयांकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.

वाचा डॉ. संजीव लाखे पाटील यांचा संपूर्ण लेख त्यांच्याच शब्दात.

सर्वोच्च_ऊलटी_गंगा..!!

जगातील सर्वात श्रीमंत आणि अद्याप अनगिणीत संपंत्तीसाठे, अनमोल हिरे,रत्ने, सोने,जवाहिरे यांचा महाप्रचंड खजिना असलेले त्रावणकोरच्या (केरळ) सुप्रसिद्ध ‘पद्मनाभास्वामी’ मंदीराच्या मालकी/व्यवस्थापनाचे संपुर्ण हक्क त्रावणकोर माजी संस्थानीक कुटुंबीयांकडे सोपवण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. मंदिरातील प्रचंड रहस्यमय व्हॉल्ट_B खजीना उघडण्यासाठी सुध्दा मा. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.

कॉंग्रेसने आणि स्व इंदिराजी गांधी यांनी देशातील सर्व संस्थाने बरखास्त करून, त्यांची खाजगी वगळता सर्व
संपत्ती देशाच्या जनतेच्या मालकिची केली होती. त्यामुळे दुखावलेले तमाम संस्थानिक कॉंग्रेसच्या विरोधात गेले
होते किंबहुना आहेतही. आणि आज सर्वोच्च न्यायालयाने काळाची चाके उलटे फिरवत माजी संस्थानिकांचे हक्क मान्य करत आजचा हा निर्णय दिला आहे हे विशेष.

सावरकरांचे मत

याच त्रावणकोर संस्थानच्या प्रचंड प्रभावशाली दिवाणाला भारतिय संघराज्यात विलीन न होता तमाम हिंदू संस्थानिकांनी स्वतंत्र राहीले पाहिजे हा लिखीत सल्ला/ मागणी ‘स्वातंत्रवीर’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या तात्यासाहेब सावरकरांनी दिला/केली होता आणि तशी मोहिम ‘कश्मिर ते नेपाळ’पर्यंत चालवली होती हे विशेष .!

डॉ. संजीव लाखे पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.