बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ‘इमर्जन्सी’ या तिच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या टीझरनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
चित्रपटाच्या टीझरची सुरुवात ही 25 जून, 1975 साली देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीवर आहे. त्यात लोक मोर्चा करत असल्याचे दिसत आहे. तर त्यानंतर एका वर्तमानपत्राचे कटआऊट दिसत आहे. त्याची हेडलाइन आहे की “स्टेट ऑफ इमर्जन्सी घोषित.” तर बॅकग्राऊंडला अनुपम खैर यांचा व्हॉइस ओव्हर ऐकायला येत आहे. यात ते म्हणत आहेत की सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांना अटक केले आहे.
टीव्हीवरील ब्रॉडकास्ट बंद करण्यात आले. तर टीझरच्या सगळ्यात शेवटी कंगना रणौत इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसत आहे. ज्यावेळी कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसते. तेव्हा तिचा एक डायलॉग आहे ज्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहेत. “मला या देशाची रक्षा करण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, कारण इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया”, असा हा डायलॉग आहे. हा 1 मिनिट 21 सेकंदाचा टीझर आहे.