मुंबई | मागच्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचलं तर काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र दिसुन येत आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळुन पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दरम्यान, हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात आलं आहे.
राज्यभरात मान्सून सक्रिय झाला असुन वीज कोसळण्याच्या झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईतही जोरदर पाऊस सुरु आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.