Latest Marathi News

BREAKING NEWS

हल्ला झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने गमावला जीव, भाजप नगरसेवकांसह ५ जणांना अटक

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच उपचारा दरम्यान निधन झाले आहे. चत्तर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त हाेऊ लागली आहे. लहान मुलांच्या भांडणातून मोठ्या हाणामारीची घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले अंकुश चत्तर हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू हाेते. उपचारादरम्यान पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अंकूश चत्तर यांची प्राणज्याेत मालवली.

समोर आलेली माहिती अशी की, एकविरा चौक परिसरामध्ये लहान मुलांचे भांडण झाले होते हे भांडणे मिटवण्यासाठी अंकुश चत्तर यांनी यांच्या भाच्याला त्या ठिकाणी पाठवले होते. हे भांडणे मिटवल्यानंतर अंकुश चत्तर यांनी सर्व मुलांना तेथून जाण्यास सांगितले त्याच वेळी त्या ठिकाणी राजू फुलारी यांनी अंकुश चत्तर यांना बाजूला घेऊन बोलायचे आहे असे सांगून थांबून ठेवले.

त्यानंतर काही मिनिटात दोन मोटार सायकलीवरून काही तरुण आले व त्यानंतर दोन काळ्या रंगाच्या चारचाकी गाडया तेथे आल्या आणि त्यातून उतरलेल्या तरुणांनी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणांच्या हातात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे, गावठी कट्टा होता तुला आम्ही जिवंत सोडणार नाही.

तु स्वप्निल भाऊच्या नादी लागतोस काय असे म्हणत तरुण अंकुश यास मारत होते. त्याचवेळी स्वप्निल शिंदे अंकुश जेथे खाली पडला होता त्या ठिकाणी आला आणि हा संपला का पहा रे, नसेल संपला तर त्यास संपवुन टाका असे म्हणून डोक्यात लोखंडी रॉड पुन्हा मारहाण केली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे यांच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.