Latest Marathi News

BREAKING NEWS

हा आदिती तटकरेंचाच अपमान नाही तर…’ गोगावले यांच्या त्या विधानावर रोहित पवारांचा टोला

0

राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन 10 दिवस झाले असले तरी अजूनही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं खातेवाटप झालं नाही. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार (शिंदे गट) मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतिक्षा करत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असंही तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून सांगण्यात येत आहे, पण अजित पवारांना अर्थखातं देण्यावरून तसंच आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद द्यायला शिवसेना आमदार तयार नसल्याचंही सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीच्या नरवनिर्वाचित मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्री करायला शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी थेट मीडियासमोरच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दावा ठोकला. हे करत असताना भरत गोगावले यांनी केलेलं वक्तव्य वादात सापडलं आहे. ‘आदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केलं असलं तरी मी त्यापेक्षा चांगलं काम करून दाखवेन. शेवटी महिला आणि पुरुष यात काही फरक आहे की नाही?’ असं भरत गोगावले म्हणाले.

भरत गोगावले यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विधानाने केवळ ना. आदितीताई तटकरे यांचाच अपमान झाला नाही तर राज्यातील ६ कोटीपेक्षा अधिक महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलंय. स्री-पुरुष असा भेदभाव करणाऱ्या अधोगामी प्रवृत्तींचा जाहीर निषेध! मा. पवार साहेबांनी महिला धोरणाच्या माध्यमातून महिलांना विविध क्षेत्रात समान स्थान आणि समान सधी दिली. याचा नेहमीच अभिमान वाटतो, पण समानतेची शिकवण देणाऱ्या, संताची भूमी असलेल्या आणि सुसंस्कृत राजकीय परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात महिला लोकप्रतिनिधींविषयी असं बेताल वक्तव्य करणं कितपत योग्य आहे?,’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.