महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा वाद चांगलाच पेटला आहे.भाजपच्यानेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही, असंच ठरवलंय का? आधी राज्याच्या वाट्याचे उद्योग पळवले, रोजगार पळवले आणि आता चक्क सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा पळवण्याचा घाट घातलाय, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
ईडी सरकारने गुवाहटीला आमदारांची फौज पळवून नेली. तिथे अदृश्य शक्तीच्या स्वरुपात आसाम सरकारने मदत केली. आणि त्याच्या बदल्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसाममध्ये देऊन तर आला नाहीत ना, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे. आसाम सरकारच्या एका जाहिरातीत पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलंय.
प्रकरण असे की, आसाम सरकारने आगामी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ६ वं ज्योतिर्लिंग कामरुप डाकिनी पर्वत आसाममध्ये आपलं स्वागत आहे, अशा आशयाची ही जाहिरात आहे.याच यादीत विविध ज्योतिर्लिंगांची याद देण्यात आली आहे. त्यात भीमाशंक ज्योतिर्लिंगाच्या नावापुढे डाकिनीमधील भीमाशंकर असा उल्लेख आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचे फोटोही जाहिरातीत आहेत.
यावर सुपार्या सुळे ट्विट करून म्हणतायत की, भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातच असल्याचे अनेक पुरावे आहेत. हे सांगताना सुप्रिया सुळे यांनी लिहिलंय , श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे.अन्य कोणतेही नाही.