Latest Marathi News

BREAKING NEWS

मंत्री गुलाबराव पाटलांनी भाजपा-शिंदे युतीला विरोध करणाऱ्यांचा घेतला समाचार

0

येणाऱ्या काही दिवसात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. गुलाबराव पाटील या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप युती एकत्रितपणे ही निवडणूक लढणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. परंतु स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा या युतीला विरोध होत आहे . आता विरोध करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा गुलाबराव पाटलांनी समाचार घेतला.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी, आपण सगळे एकनाथ शिंदे साहेबांचे लोक आहोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून एकत्र आलो आहोत, त्यांना (भाजपा-शिंदे युतीला विरोध करणारे भाजपा पदाधिकारी) काय बोलायचं ते बोलू द्या. आपण पंतप्रधान मोदींचं नेतृत्व मान्य केलं आहे. ज्यांना ते मान्य नसेल ते आपल्याला विरोध करतील, असे यावेळी म्हटले आहे.

तसेच आपण एक मोठा विचार घेऊन एकत्र आलो आहोत. परंतु छोट्यामोठ्या निवडणुकीसाठी ते (भाजपा) जर राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसत असलीत तर मोदीसाहेबांसाठी ते धोकादायक आहे असं मला वाटतं. आपण सर्वांनी शांततेने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्यावं, एकही शब्द आपण बोलायला नको, असे त्यांनी यावेळी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.