Latest Marathi News

BREAKING NEWS

‘गुगल’वर औरंगाबादचे झाले संभाजीनगर….; गुगल ने घेतली नामांतराची दखल

0

 

संभाजीनगर | आघाडीचे सर्च इंजिन असलेल्या ‘गुगल’वर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे नव्या वादाला सुरवात होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मागील २५ दिवसांत दोन वेळा शहराच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगर नामांतराचा पहिला प्रस्ताव रद्द करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसरा प्रस्ताव मंजूर केला.

तसेच केंद्र शासनाने औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नसली तरी गुगल सर्च इंजिनसह मॅपवर संभाजीनगर असे नाव दिसते आहे. सरकारच्या निर्णयाची दखल क्रोमा या कंपनीने घेत त्यांच्या लोकेशनवर संभाजीनगर केले आहे. तर शहरातील आंतरराष्ट्रीय ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांनीदेखील ‘संभाजीनगर’ असे लिहिण्यास सुरुवात केली आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून वादाचे वातावरण असताना गुगल मॅपवर औरंगाबादचे नाव बदलले आहे. गुगलवर औरंगाबाद टाकल्यावर तिथे औरंगाबादच्या खाली संभाजीनगर असे दिसते आहे. यामुळे नवा राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी गुगल व्यवस्थापनाकडे तक्रार केली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे सर्च केल्यावर दिसते आहे. हे नाव कशाच्या आधारे बदलले, असा सवाल त्यांनी ट्वीट करून विचारला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.